बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्विकारला पदभार

By सोमनाथ खताळ | Updated: February 15, 2023 13:44 IST2023-02-15T13:44:17+5:302023-02-15T13:44:37+5:30

राधाबिनोद शर्मा यांची औरंगाबादला सिडको येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून बदली.

Deepa Mudhol-Munde assumed charge as Collector of Beed | बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्विकारला पदभार

बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्विकारला पदभार

बीड : जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी औरंगाबाद येथून बीड जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा नाव लौकीक राहणार आहे. दीपा मुधाेळ-मुंडे यांची आज, बुधवार दुपारी जिल्हाधिकारी कार्यलायात येऊन पदभार स्विकारला. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी स्वागत केले.

यावेळी बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिपा मुधोळ यांच्यासमोर कार्यालयीन कामे करण्यासह बीडकरांच्या समस्या सोडविण्याचे आव्हान असणार आहे. तसेच शर्मा यांनी सुरू केलेल्या बिंदुसरा स्वच्छतेची मोहिम तशीच सुरू ठेवण्याचे आव्हानही मोठे आहे.

Web Title: Deepa Mudhol-Munde assumed charge as Collector of Beed

टॅग्स :Beedबीड