शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

मरण झाले स्वस्त; बीडमध्ये चार वर्षात २३२५ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:42 IST

‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे संदेश देणारे फलक रस्त्यारस्त्यांवर दिसतात. परंतु प्रत्यक्षात याचा उपयोग होत नसल्याचे दिसते. ते केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे समोर आले. मागील चार वर्षात बीड जिल्ह्यात तब्बल २३८५ अपघात झाले असून यामध्ये १२३६ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. तर १७८६ लोक गंभीर जखमी झाले आहेत.

सोमनाथ खताळ ।

लोकमत न्यूज नेटवर्क‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे संदेश देणारे फलक रस्त्यारस्त्यांवर दिसतात. परंतु प्रत्यक्षात याचा उपयोग होत नसल्याचे दिसते. ते केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे समोर आले. मागील चार वर्षात बीड जिल्ह्यात तब्बल २३८५ अपघात झाले असून यामध्ये १२३६ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. तर १७८६ लोक गंभीर जखमी झाले आहेत. सरासरीनुसार जिल्ह्यात दीड दिवसाला दोन अपघात, तर दिवसाला एक व्यक्ती ठार होत असल्याचे दिसून येते. खराब रस्ते, नियमांचे पालन न करणे, मद्यपान, निष्काळजीपणा, अति घाई यासारखे मुद्दे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. आकडेवारी आणि परिस्थितीवरून ‘मरण झाले स्वस्त’ अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. विस्कळीत वाहतूक व्यवस्था, नियमांचे पालन न करणे यासारखी कारणे अपघातास निमंत्रण देत आहेत. बीड जिल्ह्यातून जाणाºया सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गावरुन छोट्या मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वर्दळ पाहता हा राष्ट्रीय महामार्गा खूपच अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर सर्वाधिक अपघातांची नोंद आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. या माध्यमातून नियमांचे पालनासंदर्भात आवाहन केले जाते. तसेच मार्गदर्शनही केले जाते. परंतु प्रशासनाकडूनही कागदोपत्रीच घोडे नाचविले जात असल्याने वाहनधारकांपर्यंत जनजागृती खºया अर्थाने पोहचत नाही. याचा परिणामही अपघातांवर होत आहे.

बांधकाम विभागही जबाबदारजिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आले आहे. केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम बांधकाम विभागाकडून केले जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही रस्ते जैसे थे च आहेत. अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळेच अपघात होत असल्याचे समोर आले असून, अशा अपघातास बांधकाम विभागच जबाबदार असल्याचे सदरील परिस्थितीवरुन दिसते.

प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डेजिल्ह्यातील चार दोन रस्ते सोडता एकही रस्ता खड्डेमुक्त नाही. फुटाफुटावर खड्डे असल्याने अपघात होत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात दोन मुलींचा खड्डे चुकविताना दुचाकीवरुन पडून, तर रिक्षा पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला होता. अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत.

एआरटीओचे दुर्लक्ष कारणीभूतजिल्ह्यात विनापरवाना वाहन चालक व वाहनांचा सुळसुळाट आहे. मनुष्यबळ कमी आहे अशी कारणे देत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाया करण्यास टाळाटाळ केली जाते. तसेच त्यांचा हलगर्जीपणाच अपघातास कारणीभूत ठरतो. कार्यालयाने वेळोवेळी वाहनांची तपासणी केली तर अपघात नियंत्रणात येतील. परंतु तसे होत नाही. येथील वाहन निरीक्षक, सहाय्यक वाहन निरीक्षक या वाहनधारकांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. कार्यालयाच्या आस्थापनेवर मंजूर ४५ पैकी तब्बल ३३ पदे रिक्त आहेत. कामाचा आवाका पाहता कर्मचाºयांवर ताण पडतो. अनेकदा कार्यालयाचे कामकाज ठप्प राहते.

अल्पवयीन वाहन चालकांचा सुळसुळाटजिल्हाभरात अल्पवयीन वाहन चालकांचा सुळसुळाट आहे. परवाना नसतानाही भरधाव वाहने चालवितात. वाहन चालविण्यासाठी त्यांची शारीरिक व बौद्धिक क्षमता नसते. पाल्यांच्या हट्टापायी त्यांच्या हाती वाहनाची चावी दिली जाते. आणि हेच त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात.

भरधाव वेगही अपघातास कारणीभूत‘अति घाई संकटात नेई’ असे घोषफलक रस्त्याच्या कडेला दिसतात. परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नसते. भरधाव वाहन असताना अचानक कुत्रे-मांजर अन्य कोणीतरी आडवे येते आणि अचानक ब्रेक दाबल्यानंतर वाहन पलटी होऊन जीव जातो. दीड वर्षापूर्वी वडवणी तालुक्यात असा अपघात झाला होता.

एसटीचे दोन वर्षात १९३ अपघातमागील दोन वर्षात एसटीचे तब्बल १९३ अपघात झाले आहेत. यात २४ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. जखमींची संख्या ५० वर आहे. भरधाव वेग आणि बसवरील नियंत्रण सुटणे यामुळे एसटीचे अपघात घडत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.