मृत्युसत्र थांबेना; पुन्हा २९ बळी, १२७३ नवे रुग्ण तर १३४४ काेरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST2021-05-10T04:34:13+5:302021-05-10T04:34:13+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याची स्थिती मागील काही दिवसांपासून आहे. वाढत्या रुग्णसंख्येने रुग्णालयांमध्ये खाटा मिळवितानाही रुग्णांना अडचणी येत आहेत. अशात ...

मृत्युसत्र थांबेना; पुन्हा २९ बळी, १२७३ नवे रुग्ण तर १३४४ काेरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याची स्थिती मागील काही दिवसांपासून आहे. वाढत्या रुग्णसंख्येने रुग्णालयांमध्ये खाटा मिळवितानाही रुग्णांना अडचणी येत आहेत. अशात शनिवारपासून मात्र नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी दिवसभरात ४ हजार २७० जणांची तपासणी केली गेली. त्यामध्ये २ हजार ९९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १२७३ नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १५२, आष्टीत ४३, बीडमध्ये २९५, धारूरमध्ये ३२, गेवराईमध्ये ३४७, केजमध्ये ११७, माजलगावात ६४, परळीत ९९, पाटोद्यात ३९, शिरुरमध्ये ४३ तर वडवणीत ४२ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात १३४४ जण कोरोनामुक्त झाले त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६६ हजार ४२५ इतकी झाली आहे तर, बरे होणाऱ्यांचा आकडा ५८ हजार ६३८ इतका झाला आहे. आतापर्यंत १ हजार ११० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
----
मोकाट फिरणारे २३ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्यांच्या प्रशासनाकडून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. रविवारी यामध्ये जिल्ह्यात २१९ जणांच्या चाचण्या केल्या गेल्या यामध्ये २३ जण बाधित आढळून आले आहेत तर १९६ निगेटिव्ह आढळून आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार यांनी दिली.