विजेच्या धक्क्याने नवविवाहितेचा मृत्यू, चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:42+5:302021-09-04T04:40:42+5:30
सय्यद शमशाद सय्यद सोहेल (२५, रा. इस्लामपुरा, बीड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विद्युतपंप सुरू करताना २ सप्टेंबर रोजी ...

विजेच्या धक्क्याने नवविवाहितेचा मृत्यू, चौघांवर गुन्हा
सय्यद शमशाद सय्यद सोहेल (२५, रा. इस्लामपुरा, बीड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विद्युतपंप सुरू करताना २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, माहेरच्यांनी हा घातपात असल्याचा आरोप केला. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते. निसार तुराबखॉ पठाण (रा. इस्लामपुरा) यांच्या तक्रारीनुसार, सहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह सय्यद सोहेल सय्यद रऊफशी झाला होता. लग्नानंतर सहा महिन्यांपासून तिचा पैशांसाठी छळ सुरू होता. विद्युतपंपाची धोकादायक पिन काढायला लावल्याने विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पती सय्यद सोहेल, सासरा सय्यद रऊफ, सासू सय्यद शाहीन, दीर सय्यद फारुक यांच्यावर गुन्हा नोंद झाला. तपास उपनिरीक्षक गंगाधर दराडे करीत आहेत.