भोपा येथील तलावात मृतदेह आढळ्याने खळबळ; माजलगाव तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 13:16 IST2020-11-10T13:16:24+5:302020-11-10T13:16:53+5:30
याप्रकरणी दिंद्रुड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

भोपा येथील तलावात मृतदेह आढळ्याने खळबळ; माजलगाव तालुक्यातील घटना
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील भोपा येथील तलावात सोमवारी सायंकाळी एक मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून रतन निवृत्ती गायकवाड ( ४२ ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, दिंद्रुड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील भोपा शिवारात असलेल्या तलावात सोमवारी सायंकाळी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तलावाबाहेर काढल्यानंतर तो रतन निवृत्ती गायकवाड याचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर यांनी दिली.