घाटनांदूर येथे दत्ता वालेकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST2021-09-02T05:12:27+5:302021-09-02T05:12:27+5:30

पांडुरंग रणमाळ यांची कार्याध्यक्षपदी निवड घाटनांदूर : येथील वसुंधरा महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ यांची महाराष्ट्र ...

Datta Walekar felicitated at Ghatnandur | घाटनांदूर येथे दत्ता वालेकर यांचा सत्कार

घाटनांदूर येथे दत्ता वालेकर यांचा सत्कार

पांडुरंग रणमाळ यांची कार्याध्यक्षपदी निवड

घाटनांदूर : येथील वसुंधरा महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ यांची महाराष्ट्र राज्य जम्परोप संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल कामधेनू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक दत्ता वालेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण दळवे व उपप्राचार्य डॉ. अर्जुन मोरे, प्रा. जोगदंड, प्रा. सरनाईक प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.

अश्विनी कांबळेला राज्य जम्परोपमध्ये ब्राँझ मेडल

घाटनांदूर : येथील वसुंधरा महाविद्यालयातील अश्विनी कांबळे हिने राज्यस्तरीय जम्परोप स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. नाशिक येथे महिलांच्या खुला गट फ्री स्टाईल प्रकारात पदक मिळविल्याबद्दल बालासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थिनीला प्रा. डॉ. रणमाळ यांचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी संस्थेचे संचालक दत्ता वालेकर, प्राचार्य डॉ. अरुण दळवे व उपप्राचार्य डॉ. अर्जुन मोरे, प्रा. डॉ. मनिषा देशमुख व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.

010921\1727-img-20210901-wa0022.jpg~010921\1728-img-20210901-wa0021.jpg

प्रा डॉ पांडुरंग रणमाळ राज्यस्तरीय जम्परोप संघ कार्याध्यक्षपदी .~कु अश्वीनी कांबळेला राज्यस्तरीय जम्परोप स्पर्धात ब्रान्झ मेडल .

Web Title: Datta Walekar felicitated at Ghatnandur