अंबाजोगाईत अद्ययावत वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:39+5:302021-06-26T04:23:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील उपपरिवहन क्षेत्र कार्यालयात वाहनांचे अद्ययावत परीक्षण व निरीक्षण केंद्र ...

Up-to-date vehicle inspection, testing center at Ambajogai | अंबाजोगाईत अद्ययावत वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्र

अंबाजोगाईत अद्ययावत वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील उपपरिवहन क्षेत्र कार्यालयात वाहनांचे अद्ययावत परीक्षण व निरीक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (पुणे) या केंद्रीय संस्थेच्या अधिपत्याखाली या केंद्राची उभारणी होत आहे. यासाठी ८ कोटी ६० लाख रुपयांच्या आराखड्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राज्यातील एकूण १३ परिवहन कार्यालयात या केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहेत. या यादीत अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा समावेश आहे. या केंद्राची इमारत उभारणी, वाहन परीक्षण करणारी अद्ययावत उपकरणे, फोर लेन रॅम्प अशा विविध खर्चाच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून हे केंद्र उभारण्यात येत आहे.

Web Title: Up-to-date vehicle inspection, testing center at Ambajogai