Dare at illegal handicraft base in Pargaon Jogeshwari area | पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध हातभट्टी अड्ड्यावर धाड
पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध हातभट्टी अड्ड्यावर धाड

आष्टी : तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध गावठी हातभट्टीची तयार दारू चोरट्या मार्गाने विक्री करताना भरत रमेश काळे याला आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यास ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथील काळे हा विनापरवाना बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू घरासमोर ८ डिसेंबर रोजी १२ वाजता तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना गुप्तपणे मिळाली. त्यावरुन आष्टी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये आंबट उग्रट वास येत असलेल्या ४० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळली. प्रति लिटर ५० रुपयांप्रमाणे एकूण २० हजार रुपयांची दारु जप्त केली आहे. ही दारु विकणाऱ्या भरत काळे यास रंगेहाथ पकडून त्याच्या ताब्यातून दारू हस्तगत केली. पोलीस नाईक मुदस्सर शेख यांच्या फिर्यादीवरुन आष्टी ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. अशोक केदार हे करत आहेत.

Web Title: Dare at illegal handicraft base in Pargaon Jogeshwari area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.