दामिनी पथकाची रोडरोमिओंना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:37 IST2019-02-10T00:36:50+5:302019-02-10T00:37:17+5:30

आष्टी तालुक्यातील कडा शहरात गुरु वारी दुपारी दामिनी पथकातील कर्मचाऱ्यानी शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन रोडरोमिओंना ताकीद दिली.

Damini Squadron's Roadrunner Tambi | दामिनी पथकाची रोडरोमिओंना तंबी

दामिनी पथकाची रोडरोमिओंना तंबी

कडा : आष्टी तालुक्यातील कडा शहरात गुरु वारी दुपारी दामिनी पथकातील कर्मचाऱ्यानी शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन रोडरोमिओंना ताकीद दिली.
दामिनी पथकातील कर्मचारी पांडुरंग दराडे यांनी कडा पोलीस चौकीचे कर्मचारी बाबासाहेब गर्जे, रियाज पठाण यांना सोबत घेऊन बसस्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नागनाथ चौक आदी ठिकाणी जाऊन रोडरोमिओंना तोंडी समज दिली. येथील अमोलक शाळा, आनंदराव धोंडे महाविद्यालय, श्रीराम ज्युनियर कॉलेज, कन्या शाळा, यासह विविध ठिकाणी शाळेत भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे आता रोडरोमिओ यांची पाचावर धारण बसली असल्याचे दिसून आले असून, विद्यार्थिनींमध्ये मात्र समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

Web Title: Damini Squadron's Roadrunner Tambi