राजमाता जिजाऊप्रमाणे मुलांवर संस्कार करा - प्रा. डॉ. रणखांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST2021-02-26T04:46:45+5:302021-02-26T04:46:45+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीच्या निमित्ताने तालुक्यातील मोठेवाडी येथे गावकऱ्यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन ठेवून कार्यक्रमाचे आयोजन ...

राजमाता जिजाऊप्रमाणे मुलांवर संस्कार करा - प्रा. डॉ. रणखांब
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीच्या निमित्ताने तालुक्यातील मोठेवाडी येथे गावकऱ्यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून ज्ञानेश्वर सोळंके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्राबद्दल सविस्तर मत मांडले, यानंतर प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ संतोष रणखांब यांनी इतिहासा मधून न्याय नीती नियोजन चारित्र्य संस्कार राजकारण प्रामाणिकपणा अशा अनेक गोष्टींची शिकवण आपणास मिळू शकते. शिवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर त्याप्रमाणे वर्तन केल्यास कुठलाही व्यक्ती अयशस्वी होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून दत्तात्रय चव्हाण, उद्घाटक म्हणून गावचे सरपंच अविनाश गोंडे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिप सदस्य शिवप्रसाद खेत्री, उपसरपंच विद्यासागर करपे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी पाष्टे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोक पाष्टे, अण्णा पास्टे, भरत पास्टे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पाष्टे तर आभार प्रा. नितीन जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हनुमान आरगडे, जीवन घोडके,शिवहार औटे, सचिन पास्टे, भागवत पास्टे, सुरेश पास्टे, अमोल पास्टे, गणेश नावडकर, माऊली पास्टे,दादा नावडकर, ओमकार पास्टे, माऊली वराडे यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
250221\save_20210225_163133_14.jpg