The crowd rained in the bead for the statue of Bappas | बाप्पांच्या मूर्तीसाठी बीडमध्ये पावसात गर्दी
बाप्पांच्या मूर्तीसाठी बीडमध्ये पावसात गर्दी

ठळक मुद्देआजपासून गणेशोत्सव : २६० मंडळांची आॅनलाईन नोंदणी

बीड : सोमवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहरातील सिद्धविनायक संकुलात गणेश मूर्तींची ७० दुकाने लागली आहेत. घरातला आणि सार्वजनिक मंडळाचा बाप्पा निवडण्यासाठी रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसातही भक्तांनी गर्दी केली होती.
कुंभार समाज महासंघाच्या माध्यमातून तालुक्यात माती कलेला प्रोत्साहन मिळाले आहे. एक उत्पादक साधारण ५ लाखांपर्यंत गुंतवणूक करतो. मूर्तीसाठी लागणाºया पीओपी, रंगाच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने मूर्तीच्या किंमतीही २० टक्क्यांनी महागल्या आहेत. यंदा दुष्काळी सावटामुळे सर्वच उत्पादकांनी बाजाराचा अंदाज घेत मूर्ती निर्मिती दरवर्षीच्या तुलनेत कमी केली आहे. त्यात पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही काही उत्पादकांनी मूर्तीची निर्यात केली आहे. यावर्षी राजकीय व सामाजिक कार्यक्रमांमुळे मूर्ती बाजार उशीरा सुरु करावा लागल्याचे अर्जुन दळे यांनी सांगितले.
रविवारी सकाळपासूनच मोठी गर्दी होती. परिसरातच पूजा साहित्य, आरास सजावटीचे साहित्य खरेदीसाठीही ग्राहकांची लगबग दिसून आली.
दरम्यान जिल्हाभरातून २६० सार्वजनिक गणेश मंडळांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, यातील २०० मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित परवानगीचे काम सुरु आहे.


Web Title: The crowd rained in the bead for the statue of Bappas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.