वरवटीच्या गोशाळेत झाले गायीचे डोहाळ जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST2021-04-04T04:34:58+5:302021-04-04T04:34:58+5:30
अंबाजोगाईपासून जवळच असलेल्या वरवटी येथे अॅड. अशोक मुंडे यांची गोशाळा आहे. या गोशाळेत ४० पेक्षा जास्त गायींचे संगोपन केले ...

वरवटीच्या गोशाळेत झाले गायीचे डोहाळ जेवण
अंबाजोगाईपासून जवळच असलेल्या वरवटी येथे अॅड. अशोक मुंडे यांची गोशाळा आहे. या गोशाळेत ४० पेक्षा जास्त गायींचे संगोपन केले जाते. लोकसहभागातून मोठ्या मुश्किलीने ही गोशाळा चालते. गोशाळेतील गायींचे संगोपन करण्यासाठी अशोक मुंडे हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरातील आंबेडकर चौकात एका वासराला सुसाट वाहनाने धडक दिली. या अपघातात हे वासरू गंभीर जखमी झाले होते. शहरातील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर सोनवणे यांनी या वासराला तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर हे वासरू वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेमध्ये दाखल करण्यात आले. गोशाळेचे संचालक अशोक मुंडे यांनी या वासराचे योग्य संगोपन केले. या वासराचे रूपांतर आज एका सुंदर गायीमध्ये झाले आहे. अपघातातून बचावलेली ही गाय आज सात महिन्यांची गाभण आहे. जीवदान मिळालेल्या या गायीचे डोहाळ जेवण गोशाळेत करण्यात आले. या कामी अशोक मुंडे यांच्यासह परमेश्वर सोनवणे, सतीश जाधव, राहुल नेहरकर यांनी पुढाकार घेऊन डोहाळ जेवणाचा छोटेखानी कार्यक्रम साजरा केला. पशुप्राण्यांवरही प्रेम करून त्यांना लळा लावून माणुसकी जोपासणारे हे डोहाळ जेवण अंबाजोगाई तालुक्यात चर्चिले जात आहे.
===Photopath===
030421\fb_img_1617381747664_14.jpg
===Caption===
अपघातातून वाचलेल्या गायीचे डोहाळ जेवण वरवटीच्या गोशाळेत झाले.