शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

परळीत ‘त्या’ १२ अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:07 AM

बनावट शासकीय दस्तावेज करुन २ कोटी ४१ हजार ६७२ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन परळी शहर ठाण्यात कृषी कार्यालयाच्या २४ अधिकारी, कर्मचा-यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणातील १२ अधिका-यांनी अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात १६ मार्च रोजी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज २१ मार्च रोजी न्यायालयाने फेटाळला.

ठळक मुद्देबनावट दस्तावेज तयार करून दोन कोटी २४ लाखांचा अपहार

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : बनावट शासकीय दस्तावेज करुन २ कोटी ४१ हजार ६७२ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन परळी शहर ठाण्यात कृषी कार्यालयाच्या २४ अधिकारी, कर्मचा-यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणातील १२ अधिका-यांनी अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात १६ मार्च रोजी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज २१ मार्च रोजी न्यायालयाने फेटाळला.

परळी तालुक्यातील गावामध्ये परळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०१५-१७ मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करण्यात आली. या कामात २ कोटी ४१ हजार ६७२ रुपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार ७ मार्च २०१८ रोजी परळीचे तालुका कृषी अधिकारी भीमराव बांगर यांनी दाखल केली. त्यावरुन २४ अधिका-याच्या विरोधात परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ८ मार्चपासून यातील आरोपी हे फरार झाले आहेत.

यातील १२ जणांचे अटकपूर्व जामिनासाठीचे अर्ज वकिलामार्फत अंबाजोगाईचे जिल्हा व सत्र न्या. एस.व्ही.हंडे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या अर्जावर २१ मार्च रोजी बहस झाली. यावेळी १२ जणांचे अटकपूर्व जामिनीचे अर्ज नामंजूर करण्यात आले, अशी माहिती सहायक सरकारी वकील अ‍ॅड. लक्ष्मण फड यांनी दिली.

बुधवारी १२ जणांचे अर्ज नामंजूर झाले त्यामध्ये सूर्यकांत आवाड, अमोल कराड, बाबूराव पवार, बालाप्रसाद केंद्रे, अरविंद सूर्यवंशी, नवनाथ नागरगोजे, त्रिंबक नागरगोजे, अजित गिरी, दिलीप काळदाते, शिवाजी हजारे, सुनील गित्ते या अधिकाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :Courtन्यायालयBeedबीडagricultureशेतीPoliceपोलिस