परळीत ‘त्या’ १२ अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:07 IST2018-03-22T00:07:05+5:302018-03-22T00:07:05+5:30
बनावट शासकीय दस्तावेज करुन २ कोटी ४१ हजार ६७२ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन परळी शहर ठाण्यात कृषी कार्यालयाच्या २४ अधिकारी, कर्मचा-यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणातील १२ अधिका-यांनी अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात १६ मार्च रोजी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज २१ मार्च रोजी न्यायालयाने फेटाळला.

परळीत ‘त्या’ १२ अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : बनावट शासकीय दस्तावेज करुन २ कोटी ४१ हजार ६७२ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन परळी शहर ठाण्यात कृषी कार्यालयाच्या २४ अधिकारी, कर्मचा-यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणातील १२ अधिका-यांनी अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात १६ मार्च रोजी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज २१ मार्च रोजी न्यायालयाने फेटाळला.
परळी तालुक्यातील गावामध्ये परळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०१५-१७ मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करण्यात आली. या कामात २ कोटी ४१ हजार ६७२ रुपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार ७ मार्च २०१८ रोजी परळीचे तालुका कृषी अधिकारी भीमराव बांगर यांनी दाखल केली. त्यावरुन २४ अधिका-याच्या विरोधात परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ८ मार्चपासून यातील आरोपी हे फरार झाले आहेत.
यातील १२ जणांचे अटकपूर्व जामिनासाठीचे अर्ज वकिलामार्फत अंबाजोगाईचे जिल्हा व सत्र न्या. एस.व्ही.हंडे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या अर्जावर २१ मार्च रोजी बहस झाली. यावेळी १२ जणांचे अटकपूर्व जामिनीचे अर्ज नामंजूर करण्यात आले, अशी माहिती सहायक सरकारी वकील अॅड. लक्ष्मण फड यांनी दिली.
बुधवारी १२ जणांचे अर्ज नामंजूर झाले त्यामध्ये सूर्यकांत आवाड, अमोल कराड, बाबूराव पवार, बालाप्रसाद केंद्रे, अरविंद सूर्यवंशी, नवनाथ नागरगोजे, त्रिंबक नागरगोजे, अजित गिरी, दिलीप काळदाते, शिवाजी हजारे, सुनील गित्ते या अधिकाºयांचा समावेश आहे.