शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकाचे पद गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 1:50 PM

Majalgaon Nagarpalika News तहसीलदार यांची दिशाभुल करुन रस्त्याच्या मध्यभागापासुन ७० फुट अंतर सोडुन अकृषि परवानगी मिळवली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदारांची कारवाईअतिक्रमण करून विक्री हा सर्व प्रकार २००६ मध्ये घडलेला आहे.

माजलगाव : येथील नगर परिषदेचे सदस्य शेख मंजूर शेख चाँद यांनी तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथील गट नं. २० मधील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांचे पद धोक्यात आले आहे. याविषयी केलेल्या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या अंमलबजावणीला तहसीलदारांनी सुरुवात केली आहे.

माजलगाव- गढी दरम्यान राष्ट्रीय महामार्गालगत फुलेपिंपळगाव शिवारात गट नं. २० मध्ये असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर मजालगाव नगरपरिषदेचे सदस्य शेख मंजुर आणि सुनिल तौर यांनी अतिक्रमण करत जमिन बळकावल्याची तक्रार मनोज साळवे यांनी केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दखल घेतली. या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार वैशाली पाटील यांना दिले. यानुसार तहसीलदारांनी हे प्रकरण जमाबंदी विभागाला वर्ग करुन यात कार्यवाही अनुसरण्याचे आदेश १२ आक्टोंबर रोजी दिले आहेत. 

तक्रारीनुसार  तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी मंजूर व तौर यांच्याशी अर्थपुर्ण व्यवहार करत रस्त्यालगत १५ ते २० फुट जमीन असल्याचे जाणिपुर्वक दडवून  ठेवले.  तसेच तहसीलदार यांची दिशाभुल करुन रस्त्याच्या मध्यभागापासुन ७० फुट अंतर सोडुन अकृषि परवानगी मिळवली. अशी परवानगी मिळाल्याने गायरान जमीनीवर अतिक्रमण होत असल्याचे उघडकीस आल्याची बाब तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यानुसार ही कारवाई होत आहे. अतिक्रमण केलेली शासकीय जमीनवर भुखंड पाडून जास्त दराने विक्री केली असल्याची माहिती समोर येत आहे.

...तर नगरसेवक पद संपुष्टात येणारजमीन खरेदी, अकृषी परवाना, शासनाच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून विक्री हा सर्व प्रकार २००६ मध्ये घडलेला आहे. शेख मंजूर यांनी पालिकेची निवडणूक  २०१६ मध्ये लढवली आहे. निवडणुकीवेळी शासनाच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचे  सिद्ध होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यानुसार शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे संबंधित व्यक्तीचे पद रद्द होते यानुसार शेख मंजूर यांचे पद धोक्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडEnchroachmentअतिक्रमण