coronavirus : बीडमध्ये मसरत नगरच्या बाधितांच्या संपर्कातील आणखी दोघे पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ९०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:11 IST2020-06-15T21:10:38+5:302020-06-15T21:11:10+5:30
मसरत नगरची रुग्णसंख्या १० तर झमझम कॉलनतील २ झाली आहे.

coronavirus : बीडमध्ये मसरत नगरच्या बाधितांच्या संपर्कातील आणखी दोघे पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ९०
बीड : बीड शहरातील हैदराबादहून परतलेल्या मसरत नगर भागातील बाधितांचा संपर्क दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी आणखी दोघे पॉझिटिव्ह आले. आता बीडची रुग्णसंख्या ९० झाली आहे. सोमवारच्या ६८ पैकी ६६ रिपोर्ट निगेटिव्ह तर दोघे पॉझिटिव्ह आले.
बीड शहरात आता कोरोना वाढत आहे. मसरत नगर भागातील रुग्णांच्या संपर्कातील लोक पॉझिटिव्ह निघत आहेत. सोमवारी झमझम कॉलनीतील ३४ वर्षीय पुरूष आणि मसरत नगरमधील एका १३ वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता मसरत नगरची रुग्णसंख्या १० तर झमझम कॉलनतील २ झाली आहे. जिल्ह्यातील ९० पैकी दोघांचा मृत्यू झालेला असून ६४ कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. २४ जणांवर आता मुंबई, पुणे, औरंगाबाद व बीडमध्ये उपचार सुरू आहेत.