Coronavirus : बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण दोनशेपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:29 IST2020-07-11T11:29:17+5:302020-07-11T11:29:52+5:30
आज 20 बाधितांची जिल्ह्यात भर

Coronavirus : बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण दोनशेपार
बीड : बीड जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्हचे 20 रुग्ण आढळले, एकाच दिवशी एवढे रुग्ण कोरोना बाधित होण्याची ही पहिली वेळ आहे. यामुळे बीड जिल्हा हादरला असून चिंतेचे वातावरण आहे.
बीडमध्ये आठ, गेवराईत सहा तर परळीत चार जण तर आष्टी, धारूर येथे एक पॉझिटिव्ह आढळला. यापूर्वी एकाच दिवशी 14, 17 असे बाधित रुग्ण आढळले होते. आजच्या 20 बाधितामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 213 झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत जवळपास 524 स्वाब घेतले होते, त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.