Coronavirus : बीड जिल्ह्यात कोरोनाचा बारावा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 11:25 IST2020-07-14T11:25:23+5:302020-07-14T11:25:41+5:30
७८ वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू

Coronavirus : बीड जिल्ह्यात कोरोनाचा बारावा बळी
बीड : बीड येथील एका ७८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा बारावा बळी ठरला.
पाटोदा तालुक्यातील एकाचा बीड सामान्य रुग्णालयात तर केज येथील एकाचा अंबाजोगाईत एसआरटी रुग्णालयात मृत्यू झाला. या दोघांचेही स्वयाब रिपोर्ट यायचे आहेत. पाटोदा तालुक्यातील एका ४८ वर्षीय रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला बीडच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा देखील मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप त्याचा कोरोना अहवाल आलेला नाही.