coronavirus : आनंदवार्ता ! सात महिन्यांच्या बालकाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 20:12 IST2020-07-17T20:10:59+5:302020-07-17T20:12:51+5:30

बँक कर्मचारी ,त्यांचे वडील व सात महिन्याच्या बालकास कोरोनाची लागण झाली होती.

coronavirus: A seven-month-old baby overcomes coronavirus | coronavirus : आनंदवार्ता ! सात महिन्यांच्या बालकाची कोरोनावर मात

coronavirus : आनंदवार्ता ! सात महिन्यांच्या बालकाची कोरोनावर मात

परळी : परळीतील चौघांना आज रुग्णालयातून सुटी मिळाली.  यात एसबीआय बँकेच्या एका कर्मचाऱ्यांसह त्यांच्या सात महिन्याच्या बालकाने कोरानावर यशस्वी मात केली. अंबाजोगाईच्या कोविड सेंटरमधून त्यांना १७ जुलै रोजी सुटी देण्यात आली. यानंतर सात महिन्यांचे बालक कोरोनाला हरवून स्वगृही दाखल झालं आहे. शहरातील आतापर्यंत एकूण १६ जण कोरोना मुक्त झाले आहेत

शहरातील एसबीआय बँकेच्या पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांना चार जुलै रोजी कोरोना  विषाणू ची  लागण झाली होती ,कोरोना पॉझिटीव्ह आलेल्यांना तातडीने  उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले . डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी औषध उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले आहे. शुक्रवारी सात महिन्याच्या बालकास व वडिलांस कोरोना मुक्त झाल्याने दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे.

बँक कर्मचारी ,त्यांचे वडील व सात महिन्याच्या बालकास कोरोनाची लागण झाली होती. बालक व त्याचे वडील परळीत आले आहेत. या बँक कर्मचाऱ्याच्या वडिलांवर अंबाजोगाईत उपचार चालू असून लवकरच त्यांना ही सुटी मिळेल असे तालुका आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: A seven-month-old baby overcomes coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.