CoronaVirus : दिल्लीत दुकानाची खरेदीकरून परतलेला परळीचा व्यापारी निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:58 IST2020-04-03T12:56:14+5:302020-04-03T12:58:26+5:30

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाच्या कक्षेत अलग ठेवण्यात आले आहे.   

CoronaVirus: Parali trader who came from Delhi after purchasing was quarantine | CoronaVirus : दिल्लीत दुकानाची खरेदीकरून परतलेला परळीचा व्यापारी निगराणीत

CoronaVirus : दिल्लीत दुकानाची खरेदीकरून परतलेला परळीचा व्यापारी निगराणीत

- संजय खाकरे

परळी: दुकानाच्या खरेदीसाठी  दिल्लीत जाऊन आलेल्या परळी च्या एका व्यक्तीस गुरुवारी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाच्या कक्षेत अलग ठेवण्यात आले आहे.                             

नवी दिल्लीतील निजामुद्दीन मरकज मध्ये धार्मिक संमेलन चालू असतानाच परळी  येथील   एक कपड्याचा दुकानदार दिल्ली येथे  खरेदीसाठी गेलेला  होता. तो दुकानदार परळीला परत आला आहे,कार्यक्रम स्थळीकडे तो फिरकला नसल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीत जाऊन आलेल्यांची  माहिती  पोलीस व आरोग्य प्रशासनाने  परळीत घेणे सुरू केले आहे. 

गुरुवारी दिल्लीत जाऊन आल्याचे समजताच  त्यास  आरोग्य व पोलीस अधिकाऱ्यांनी बोलावून घेऊन अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णाल्यात वैद्यकीय  तपासणीसाठी पाठविले आहे .गुरुवारी त्याच्या घश्याचे स्वॅब अंबाजोगाईच्या  स्वा.रा.ती वैद्यकीय रुग्णाच्या डॉक्टरांनी  घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे.

याचा अहवाल  शुक्रवारी सायंकाळी येण्याची शक्यता आहे अशी माहिती परळी चे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण मोरे व उप जिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे यांनी दिली

Web Title: CoronaVirus: Parali trader who came from Delhi after purchasing was quarantine