CoronaVirus: Nine more reports negative in Beed; Relief to the health system | CoronaVirus : बीडचे आणखी नऊ अहवाल निगेटिव्ह; आरोग्य यंत्रणेला दिलासा

CoronaVirus : बीडचे आणखी नऊ अहवाल निगेटिव्ह; आरोग्य यंत्रणेला दिलासा

बीड : बीड जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे पाठविलेले नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी सायंकाळी हे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला मिळाले. आतापर्यंत २५ अहवाल पाठविलेले असून सुदैवाने सर्वच निगेटिव्ह आलेले आहेत.

बीड जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात कोरोना संशयितांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. या दोन्ही रुग्णालयात मिळून ९ लोक दाखल झाले होते. त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यांचे अहवाल बुधवारी सायंकाळी आला असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत २५ संशयितांचे स्वॅब घेतले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

Web Title: CoronaVirus: Nine more reports negative in Beed; Relief to the health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.