शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

coronavirus : कोरोनाबाधिताचा बेजबाबदारपणा; रुग्णालयात वावर, सार्वजनिक टाकीवर झाला ‘फ्रेश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 7:44 PM

सुशिक्षित असलेल्या रुग्णाच्या बेजबाबदारपणामुळे संताप व्यक्त होत आहे. हे कुटूंब बीडकरासांठी चांगलेच त्रासदायक ठरले आहे. 

ठळक मुद्देसुशिक्षित रुग्णाचा बेजबाबदारपणा अहमदनगरचे ‘ते’ कुटुंब बीडकरांसाठी ठरले चिंतेचा विषय

बीड : अहमदनगर जिल्ह्यातील एक कुटूंब बीडमध्ये कोरोना पॉजिटिव्ह आढळले होते. त्यांनी पुण्याला उपचार घेण्याची इच्छा दर्शविली. पुण्याला पाठवित असतानाच त्यातील एक  पुरूष रुग्णवाहिकेत बसून न राहता रुग्णालय परिसरात वावरल्याचे समोर आले आहे. तसेच एका सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ जावून तो फे्रशही झाला. हा प्रकार एका व्हिडीओमधून समोर आला आहे. सुशिक्षित असलेल्या रुग्णाच्या बेजबाबदारपणामुळे संताप व्यक्त होत आहे. हे कुटूंब बीडकरासांठी चांगलेच त्रासदायक ठरले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवाशी असतानाही सात लोकांचे कुटूंब आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे सासरवाडीला आले. येथे चार दिवस राहिल्यानंतर त्यांना लक्षणे जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात आणले. येथे सर्वांचेच रिपोर्ट पॉजिटिव्ह आढळले. त्यानंतर सांगवी पाटण पसिरातील ७ किमी अंतरातील गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. प्रशासन कामाला लागले. रोज घरोघरी जावून सर्वेक्षण करण्याबरोबरच आजारी लोकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरूवात झाली. तसेच बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही झपाट्याने वाढला आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

इकडे उपचारासाठी रुग्णालयात आणल्यावर याच कुटूंबातील ६५ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर याच कुटूंबातील एका पुरूषाने आम्हाला सुविधा नाहीत, उपचार व्यवस्थित नाहीत, असे सांगत सर्वाना संपर्क केला. आपल्याला पुण्याला उपचारासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. रेफरसंदर्भात कारवाईसाठी अख्ख प्रशासन कामाला लागले. सायंकाळच्या सुमारास कशीतरी परवागनी देण्यात आली. १०८ रुग्णवाहिका एक डॉक्टर आणि एक चालक अशी यंत्रणा सज्ज झाली. त्यांना खाली आणल्यावर कुटुंबातील ह्या सहाही व्यक्ती रुग्णवाहिकेत न बसता बाहेर बसल्या. यातील एक पुरूष पाण्याची बाटली हातात घेऊन सार्वजनिक टाकीवर गेला. येथे पाणी घेऊन तो फे्रश झाला. यावेळी बाजूला तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होती. त्याच टाकीवरून इतर रुग्ण व नातेवाईकांनी पाणी नेल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. हा रुग्ण सुशिक्षित असतानाही त्याने केलेल्या बेजबाबदारपणामुळे संताप व्यक्त होत आहे. त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

प्रकरणाची चौकशी; पोलीस ठाण्यात तक्रारपुण्याला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चालक हा पीपीई कीट बदलून येत होता. त्यामुळे त्याला १० मिनिटांचा वेळ लागला. तेवढ्यात हा रुग्ण परिसरात मुक्तपणे वावरल्याचे दिसते. या प्रकरणात नेमके काय झाले? याची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत संबंधित रुग्णाविरोधात पोलीस ठाण्या तक्रारही दिली आहे. 

प्रशासनालाही हलगर्जी भोवणारआरोग्य विभाग आणि सुरक्षा व्यवस्थेचाही या प्रकरणी हलगर्जीपणा झाल्याचे दिसते. रुग्णवाहिका पूर्ण निघण्याची तयारी झाल्यावरच त्यांना वॉर्डमधून खाली आणणे अपेक्षित होते आणि आणल्यानंतरही ते रुग्णवाहिकेतून खाली उतरणार नाहीत, इकडे तिकडे जाणार नाहीत, याबाबत सुरक्षा रकक्षकांनी लक्ष देणे अपेक्षित होते. या प्रकरणात सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सकारात्मक विचार करून उपाययोजना करण्याची मागणी सामान्यांमधून होत आहे. 

पुण्याला पाठविण्यापूर्वी रुग्णवाहिकेत न बसता रुग्ण इतरत्र वावरल्याचा व्हिडीओ पाहिला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच रुग्ण हा सुशिक्षित आहे. सर्व परिस्थिती ज्ञात असतानाही त्याने केलेल्या बेजबाबदारपणामुळे त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कारवाई केली जाईल. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

जिल्हा रुग्णालयातील तक्रार आली आहे. याबाबत चौकशी केली जाईल. त्यानंतर कारवाई करू.- गजानन जाधव, सपोनि, शहर पोलीस ठाणे, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड