coronavirus : बीडमधील दुबई रिटर्न महिलेची प्रकृती ठणठणीत; केवळ अहवालाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 11:51 IST2020-03-20T11:51:02+5:302020-03-20T11:51:46+5:30
कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

coronavirus : बीडमधील दुबई रिटर्न महिलेची प्रकृती ठणठणीत; केवळ अहवालाची प्रतिक्षा
बीड : दुबईहुन परतलेल्या महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच जिल्हा रुग्णलायातील गुरूवारी दुपारी आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या तिची प्रकृती ठणठणीत आहे. तिचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले असून आता केवळ अहवालात काय येते, याची प्रतिक्षा आहे. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
दुबई येथे बहिणीकडे गेलेली महिला बीडमध्ये परतली होती. पुण्याहून बीडला आल्यानंतर सकाळीच तिला सर्दी, ताप अशी लक्षणे जाणवू लागली. आरोग्य विभागाने तत्काळ या महिलेला दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने तिची तपासणीही केली. त्यानंतर स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल शनिवारी दुपारपर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
महिलेची प्रकृती ठणठणीत
आयसोलेशन वॉर्डमध्ये असलेल्या महिलेवर तज्ज्ञांकडून वेळच्या वेळी तपासणी करून उपचार केले जात आहे. सध्या तिची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. अहवाल आल्यावरच पुढे काय ते समजेल.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड