coronavirus: Gudhi padwa celebration in simple way,greetings by social media | coronavirus : जगावरील कोरोनाचे संकट टळावे;साध्या पद्धतीने गुढी उभारून नागरिकांच्या सोशलमीडियावरून शुभेच्छा

coronavirus : जगावरील कोरोनाचे संकट टळावे;साध्या पद्धतीने गुढी उभारून नागरिकांच्या सोशलमीडियावरून शुभेच्छा

- अविनाश कदम 
आष्टी : तालुक्यात मराठी नविन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने आरोग्याच्या हिताची गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा संचारबंदी लागू केल्यामुळे कुठेही न जाता कुटुंबासमवेत नागरिकांनी साजरा केला. नविन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊ शकत नसल्याने कोरोना संकट टळुन सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशा सदिच्छा एकमेकांना सोशलमिडीयाच्या माध्यमातून देण्यात आल्या.

कोरोना व्हायरचा पादुर्भाव टाळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस देश लाॅक डाऊनची घोषणा केली आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये संचार बंदी लागु केल्याने 
मराठी नववर्षाची गुढी उभारण्यासाठी आणि तिची पूजा करण्यासाठी पुजेसाठी लागणारी फुलं, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी असे सर्व साहित्य शहरी भागासह ग्रामीण भागात तुटवडा आला होता.ग्रामिण भागातील किराणा दुकानातील पुजेसाठी लागणारे साहित्य सकाळीच संपल्याने नागरिकांनी यंदा आरोग्याच्या हितासाठी पूजेच्या या साहित्याविना गुढी उभारली.

महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी आनंदात आणि उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये गुढी उभारून तिला गोड नैवैद्य दाखविला जातो. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरविली जाते. या दिवशी घरोघरी जात आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतन केले जाते. मात्र,यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने सोन्याचे दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे, मिठाई आदी दुकानांसह सध्या विविध बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत.कोरोनाचे संकट टळो सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा नागरिकांनी घरात बसून एकमेकांना व्हाॅट्सअॅप,फेसबुक,या सोशलमिडीयाद्वारे दिल्या.

Web Title: coronavirus: Gudhi padwa celebration in simple way,greetings by social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.