coronavirus : गुढीपाडवा दिनी बीडकरांसाठी शुभ वार्ता; आयसोलेशन वॉर्डमधील सर्व संशयित निगेटिव्ह, रुग्णालयातून केली सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:58 IST2020-03-25T12:56:51+5:302020-03-25T12:58:43+5:30

स्वॅब चे चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह

coronavirus: Good news for Beedkar on Gudipadwa day; All suspected negatives in isolation ward, hospital leave | coronavirus : गुढीपाडवा दिनी बीडकरांसाठी शुभ वार्ता; आयसोलेशन वॉर्डमधील सर्व संशयित निगेटिव्ह, रुग्णालयातून केली सुटी

coronavirus : गुढीपाडवा दिनी बीडकरांसाठी शुभ वार्ता; आयसोलेशन वॉर्डमधील सर्व संशयित निगेटिव्ह, रुग्णालयातून केली सुटी

ठळक मुद्देआतापर्यंत 8 रुग्ण दाखल केले होतेसर्वांचे अहवाल आले निगेटिव्ह

बीड : जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये रोज एक ते दोन नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल होत होते. परंतु पाढव्याच्या मुहूर्तावर शुभ बातमी समोर आली आहे. दाखल असलेल्या सर्वच आठही लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्व:स सोडला आहे.

बीड जिल्ह्यात विदेश व कोरोन बाधित जिल्ह्यातून आलेल्या लोकांना ‘होम क्वारंटाईन’ केले जात आहे. तसेच ज्यांना श्वास घेण्यास त्रास, खोकला, सर्दी व ताप अशी लक्षणे जाणवली त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब तपासणीला घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आतापर्यंत आठ रुग्ण दाखल केले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याने सर्वांनाच रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या आयसोलेशन वॉर्डमध्ये एकही रुग्ण नसल्याने दिलासा मिळत आहे. गुढी पाढव्याच्या दिवशी शुभ बातमी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: coronavirus: Good news for Beedkar on Gudipadwa day; All suspected negatives in isolation ward, hospital leave