CoronaVirus : भीमजंयतीनिमित्त जमाव जमवल्याप्रकरणी माजी नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:12 IST2020-04-15T11:50:00+5:302020-04-15T12:12:31+5:30

माजलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

CoronaVirus: FIR against Former councilor in Beed due to mob for mobilization | CoronaVirus : भीमजंयतीनिमित्त जमाव जमवल्याप्रकरणी माजी नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल

CoronaVirus : भीमजंयतीनिमित्त जमाव जमवल्याप्रकरणी माजी नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल

माजलगाव: कोरोना संसर्गामुळे संचारबंदी असतानाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सायंकाळी 7 वाजता भीमनगर येथील पुतळ्याजवळ जमाव एकत्र आला होता. या प्रकरणी माजी नगरसेवक राजेश साळवे व इतर 7 जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉन्स्टेबल अंबादास बेले यांच्या फिर्यादी वरून शहरातील भीमनगर येथे राजेश साळवे व इतर 7 जणांनी भीम जंयती निमित्त जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले तसेच आपत्कालीन व्यवस्थापन कायदा तोडण्याचा प्रयत्न करून जमाव बंदी आदेशाला झुगारून गैरकायद्याची मंडळी एकत्र केली याप्रकरणी भारतीय दंड संहिता 188,269,270 नुसार राजेश साळवे व  इतर 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए जे पवार हे करत आहेत

Web Title: CoronaVirus: FIR against Former councilor in Beed due to mob for mobilization