Coronavirus : कोरोनाच्या भीतीने केला घात; रिपोर्ट निगेटिव्ह असूनसुद्धा तरुणाने संपवला जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:58 IST2020-07-25T13:56:27+5:302020-07-25T13:58:28+5:30

आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन्ही हातांच्या नसा कापल्याची प्राथमिक माहिती आहे.

Coronavirus: coronavirus; Despite the negative report, the young man ended his life journey | Coronavirus : कोरोनाच्या भीतीने केला घात; रिपोर्ट निगेटिव्ह असूनसुद्धा तरुणाने संपवला जीवनप्रवास

Coronavirus : कोरोनाच्या भीतीने केला घात; रिपोर्ट निगेटिव्ह असूनसुद्धा तरुणाने संपवला जीवनप्रवास

ठळक मुद्देआठ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलामला कोरोना झाला आहे असे म्हणत एका रूममध्ये क्वारंटाइन केले होते.

गेवराई : अहवाल निगेटिव्ह असून सुद्धा कोरोनाच्या भितीने एका तरुणाने स्वतःला क्वारंटाइन केले. यानंतर दोन्ही हाताच्या नसा कापून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश बाळकृष्ण गायकवाड असे मृताचे नाव असून शहरातील अहिल्यानगर येथे ही घटना घडली.

तालुक्यातील धोंडराई येथील प्रकाश गायकवाड हे पुणे येथे खाजगी नोकरीस होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ते शहरातील अहिल्या नगर भागात मागील तीन महिन्यांपासून वास्तव्यास होते. आठ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला. त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. 
परंतु, मला कोरोना झाला आहे असे म्हणत त्यांनी स्वत:ला एका रूममध्ये  क्वारंटाइन केले होते. कोरोनाबदलची भिती वाढत जाऊन त्यांनी शनिवारी पहाटे पाचच्या वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन्ही हातांच्या नसा कापल्याची प्राथमिक माहिती आहे.  याप्रकारणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Coronavirus: coronavirus; Despite the negative report, the young man ended his life journey