शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाची कमाल... विक्रीच नसल्याने काकडीचा झाला भोपळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 13:29 IST

विक्रीस आणलेला निम्मा भाजीपाला फेकून देण्याची वेळ

ठळक मुद्देटनावर आलेले पीक फेकून देण्याची वेळजळगाव मंजराच्या शेतकऱ्याची व्यथा

- अनिल भंडारीबीड : पिकलेलं माळवं शहरात नेऊन विकता येईना... अडीच तासात विकून विकून किती विकणार. उरलेला परत न्यायची वेळ, फेकून दिले तर जनावरेही खाईनात.. काकडीतर टनावर उगवली. काकडीचा भोपळा झाला.. फेकून द्यायची वेळ आली बघा...अशी व्यथा गेवराई तालुक्यातील रुईधानोरालगत असलेल्या जळगाव मंजरा येथील सतीश गव्हाणे नामक भाजी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत होता. 

सतीश गव्हाणे भाजीशेती करतात. भेंडी, गवार, टोमॅटो, मिरची, काकडीचे उत्पादन घेतात. मंगळवारी संचारबंदीतील शिथिल वेळ संपली आणि भाज्यांचे एकावर एक असे चार कॅरेट लावलेल्या दुचाकीवरुन गावची वाट धरली. वाटेत लोकमत प्रतिनिधीने थांबवून चर्चा केली असता भाजी उत्पादकांची व्यथा समोर आली. वेळ कमी असल्याने आणलेला भाजीपाला विकत नाही. फिरुन विकायलाही परवडत नाही. आधी चांगलं होतं, एकाच ठिकाणी बसून कमी- जास्त दरात विकायचो पण सगळा भाजीपाला विकत होता. विक्रीला वेळ वाढवून दिलातरी लोक बाहेर येत नाहीत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आता निम्मा माल परत घरी घेऊन जावा लागतोय. सुकून खराब होतो. त्यात उद्या परत बंद आला. कसा विकणार भाजीपाला? असा सवाल करतानाच जनावरंही खाऊन कंटाळल्याचे तो म्हणाला. 

सारं कसं पांगलंय लहान भाजी उत्पादक शेतकऱ्यांना कोणी समजुनच घेईना.पहिले व्यवस्थित होतं, लॉकडाऊनपासून सगळं गणितच बिघडलं बघा. एक- दोन ग्राहक खरेदी करु लागले की, गर्दी करु नका म्हणत हुसकावलं जातं. आमचे भाव परवडणारे अन् माल ताजा असतो, पण सारं कसं पांगलंय. शिल्लक राहिलेला भाजीपाला फेकून द्यावा लागतोय, जनावरंही खाऊन- खाऊन कंटाळल्याचे हा शेतकरी म्हणाला. गावात इतरही अनेक भाजी उत्पादक शेतकरी आहेत, पण अशा परिस्थितीमुळे तेही माळवं विकायला येत नसल्याचे सतीश गव्हाणे म्हणाला. 

चल गं काकडी टुणूक टुणूक... आहे शेतातच पडूनबालजगतमध्ये ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ अशी लघुकथा होती. मात्र सध्याच्या परिस्थिती ‘चल गं काकडी टुणूक टुणूक म्हणायची वेळ आली आहे. परंतू कोरोनामुळे शेतातच २ किलो भोपळ्याएवढी पिकलेली पोसलेली काकडी पाहून उत्पादकांवर रडायची वेळ आली आहे. सतीश गव्हाणे यांनी त्यांच्या एक एकर शेतात काकडीचे पीक घेतले. बी, खत, औषधे, वेल व्यवस्थापन आणि कुंणावर १८ हजारापर्यंत खर्च केला. किमान सव्वालाख रुपये येतील अशी आशा होती. पदरी मात्र ४-५ हजारच आले. रोज तोडीवी लागते, पण तोडून विकायची कोठे हा प्रश्न आहे. त्यामुळे टनावर काकडी शेतातच पडून आहे. तिला बाहेर काढायचा खर्च वेगळाच लागणार आहे. 

आमदनी अठन्नी, खर्चा रुपयागावापासून बीडपर्यंत येणं जाणं दिडशे रुपयांचं पेट्रोल लागतं. भाजी विक्रीतून कसेबसे ४०० रुपये येतात. भाजी तोडणीला घरच्या लोकांशिवाय २०० रुपये रोजने गडी लावावा लागतो. घर कसं चालवायचं? हायतोवर जपतोय. भाजी विक्रीला विनात्रास वेळ वाढवून मिळाला तर बरं होईल, अशी प्रतिक्रिया तरुण शेतकऱ्याने व्यक्त केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडFarmerशेतकरी