CoronaVirus : दिलासादायक ! बीडमधील आतापर्यंतचे ४० अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 18:25 IST2020-04-02T18:25:33+5:302020-04-02T18:25:49+5:30
अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालय व बीड जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत.

CoronaVirus : दिलासादायक ! बीडमधील आतापर्यंतचे ४० अहवाल निगेटिव्ह
बीड : बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संशयित असलेल्या ४० लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालय व बीड जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. विदेश, परराज्य अथवा परजिल्ह्यातून आलेले आणि लक्षणे असलेल्या संशयितांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जात आहे. गुरूवारी अंबाजोगाईत सात आणि बीडमध्ये एका संशयितावर उपचार सुरू होते. त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेले होते. गुरूवारी सायंकाळी त्यांचा अहवाल आला असून ते निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत पाठविलेले ४० म्हणजे सर्वच अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.