Coronavirus In Beed : कोरोनाचा चौथा बळी; परळीतील महिलेचा उपचारादरम्यान औरंगाबादमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 03:00 PM2020-06-18T15:00:58+5:302020-06-18T15:01:49+5:30

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

Coronavirus In Beed: The fourth death of coronavirus; Woman from Parali dies in Aurangabad while undergoing treatment | Coronavirus In Beed : कोरोनाचा चौथा बळी; परळीतील महिलेचा उपचारादरम्यान औरंगाबादमध्ये मृत्यू

Coronavirus In Beed : कोरोनाचा चौथा बळी; परळीतील महिलेचा उपचारादरम्यान औरंगाबादमध्ये मृत्यू

googlenewsNext

बीड : मधूमेह, हायपरटेंशन, न्यूमोनिया, किडनीचा आजार असलेल्या परळी शहरातील एका ५७ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उपचारासाठी औरंगाबादला गेल्यावर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दोन दिवसांपूर्वीच केज तालुक्यातील माळेगाव येथीलही एका महिलेलचा औरंगाबादमध्ये कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा बळी गेला आहे. केजच्या महिलेची अद्याप नोंद नसल्याने जिल्हा आरोग्य विभागाकडे केवळ तिघांची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी तिघांचा मृत्यू झाला असून ७१ जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. परळी शहरातील एक महिला किडणीचा आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबादला गेल्यावर  ५ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तिला किडीच्या आजारासह मधूमेह, हायपरटेंशन, न्यूमोनिया हे आजारही होते. बुधवारी तिला रुग्णालयातून सुटीही देण्यात येणार होती. परंतू डायलेसीस करायचे असल्याने ठेवण्यात आले होते. परंतु गुरूवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील चौथा बळी ठरला आहे. 

आतापर्यंत यांचा झाला मृत्यू
मुळेच अहमदनगर जिल्ह्यातील परंतू आष्टी तालुक्यातील पाटण येथे नातेवाईकांकडे आलेली ६५ वर्षीय वृद्ध महिला, मातावळी येथील ३५ वर्षीय व्यक्ती, केज तालुक्यातील माळेगाव येथील ६० वर्षीय महिला आणि आता परळीच्या महिलेचा समावेश आहे. केजच्या महिलेची अद्याप बीड जिल्हा आरोग्य विभागाकडे नोंद नाही.

Web Title: Coronavirus In Beed: The fourth death of coronavirus; Woman from Parali dies in Aurangabad while undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.