coronavirus: BEED @ 55: Addition of 8 more corona positive patients | coronavirus : बीड @ ५५ : आणखी ८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

coronavirus : बीड @ ५५ : आणखी ८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५५ इतकी झाली आहे. 

सोमवारी एकूण ५७  स्वॅबपैकी ५० अहवाल निगेटिव्ह आले होते.  ७ अहवाल प्रलंबित होते. यापैकी मंगळवारी दुपारी २ अहवाल पॉझिटिव्ह आले तर  पाच अहवाल अनिर्णित होते. मंगळवारी जिल्हयातील आणखी २८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री प्राप्त झाला. त्यानुसार २२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज या भागात आढळले बाधित :
हाळंब (परळी) - २
बारगजवाडी (शिरूर) - २
कारेगाव ( पाटोदा ) - १
वाहली ( पाटोदा) -१ 
बीड शहर ( दिलीपनगर ) - २ 

Web Title: coronavirus: BEED @ 55: Addition of 8 more corona positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.