coronavirus : बीडमध्ये आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:45 PM2020-05-24T22:45:19+5:302020-05-24T22:46:09+5:30

सर्व बाधित मुंबईहुन आलेले आहेत

coronavirus: Addition of six more corona positive patients in Beed | coronavirus : बीडमध्ये आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर

coronavirus : बीडमध्ये आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Next

बीड :  जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत रविवारी पुन्हा भर पडली. रात्री प्राप्त अहवालानुसार आणखी ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

  या रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील साखरे बोरगाव येथील एक पुरुष, एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. तसेच पाटोदा येथे एक पुरुष तर वडवणीत एक पुरुष व एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. सर्व सहा जण हे मुंबई येथून आलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७ आहे. त्यातील एक कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू झाला आहे. ६ पुण्याला पाठविले असून 39 जणांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: coronavirus: Addition of six more corona positive patients in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.