CoronaVirus : बीडमध्ये आणखी ९ अहवाल निगेटिव्ह; आतापर्यंत १२९ अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:12 IST2020-04-13T19:11:35+5:302020-04-13T19:12:43+5:30
जिल्ह्यातून पाठवलेले सर्व रिपोर्ट निगेटिव्ह

CoronaVirus : बीडमध्ये आणखी ९ अहवाल निगेटिव्ह; आतापर्यंत १२९ अहवाल निगेटिव्ह
बीड : बीड जिल्ह्यातील ९ कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात सोमवारी सकाळी घेतले होते. औरंगाबादच्या प्रयोगशाळेतून सायंकाळी अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बीड व अंबाजोगाई येथे कोरोना संशयितांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत. यात सोमवारी सकाळी ९ जण दाखल झाले होते. या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून पाठविलेले सर्वच १२९ अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली.
दरम्यान, आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे एकमेव कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून त्याच्यावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.