CoronaVirus: 11 report negative in Beed, four waiting | CoronaVirus : बीडमधील सर्व १५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

CoronaVirus : बीडमधील सर्व १५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

बीड : जिल्ह्यात १५ कोरोना संशयितांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा अहवाल आला असून सर्वला सर्व निगेटिव्ह आले आहेत. 

बीड जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. आतापर्यात दोन्हीकडे मिळून ५५ लोक दाखल झाले होते. गुरूवारी बीडमधील १३ व अंबाजोगाईतील २ असे  १५ स्वॅब तपासणीला घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या ६ रुग्ण आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या निगराणीत असून सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य सूत्रांकडून सांगण्यात आले. ४९ लोकांना घरी पाठविण्यात आले आहे. 

Web Title: CoronaVirus: 11 report negative in Beed, four waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.