CoronaVirus : ३६ दिवसांत १ लाख ४६ हजार नागरिकांचा बीडमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:44 PM2020-04-07T18:44:01+5:302020-04-07T18:45:58+5:30

बाहेरून आलेल्यांची गावपातळीवर माहिती आरोग्य विभागाचे पथक घेत आहे.

CoronaVirus: 1 lakh 46 thousand citizens enter the Beed in 36 days | CoronaVirus : ३६ दिवसांत १ लाख ४६ हजार नागरिकांचा बीडमध्ये प्रवेश

CoronaVirus : ३६ दिवसांत १ लाख ४६ हजार नागरिकांचा बीडमध्ये प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून माहिती उघडविदेशातील ११३ जणांचा समावेश

- सोमनाथ खताळ
बीड : विदेशासह बाधित व इतर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य विभागाकडून नोंद घेतली जात आहे. १ मार्च पासून आजपर्यंत तब्बल १ लाख ४६ हजार ९६० लोकांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. विदेशातून आलेल्या लोकांची संख्या ११३ आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक २७ हजार लोक आले आहेत. आरोग्य विभागाच्या दोन टप्प्यात झालेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यातच विदेश व परजिल्ह्यातून आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. आरोग्य विभागाकडून आशा सेविका, अंगणवाडी सेविकांसह आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाºयांमार्फत दोन टप्प्यात सर्वेक्षण करण्यात आले आहे. रविवारी दुसरा टप्पा पूर्ण झाला असून, १ लाख ४६ हजार ९६० लोक हे १ मार्चपासून आजपर्यंत बीड जिल्ह्यात आलेले आहेत. यात विदेशातून आलेल्या ११३ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. पैकी १०४ जणांचा क्वारंटाईन कालावधी संपलेला असून, केवळ ९ लोक होम क्वारंटाईन आहेत. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेले २५ लोक सद्यस्थितीत क्वारंटाईन करण्यात आली आहेत.

गावपातळीवर आशा अंगणवाडी सेविकांमार्फत झालेल्या सर्वेक्षणाचा आढावा ४४० पथकांमार्फत घेण्यात आला. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी अहवालाची चाचपणी करुन तो जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे पाठवला आहे. यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचारी, सेविका यांनी सर्वेक्षण पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

यापुढेही नियमित संपर्क
सर्वेक्षण पूर्ण झाले म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता नियमित संपर्क साधून त्यांच्या तब्येतची काळजी घेतली जाणार आहे. थोडीही लक्षणे दिसून आली की तात्काळ आरोग्य पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे. गंभीरता वाटताच आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जाणार आहे.

प्रत्येक ताप असलेल्या रुग्णाची नोंद
प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांची नोंद होतेच. परंतु आता ज्यांना ताप आहे अशांची स्वतंत्र नोंद केली जाणार आहे. सोमवारी दुपारी जिल्ह्यातील सर्व तालुका व वैद्यकीय अधिकाºयांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी हे आदेश दिले आहेत.

दोन टप्प्यात सर्वेक्षण केले आहे
१ लाख ४६ हजार ९६० लोक बाहेरुन आले आहेत. सर्वांची नोंदणी, तपासणीसह होम क्वारंटाईनची कार्यवाही झालेली आहे. यापुढे त्यांच्या नियमित संपर्कात राहणार आहोत. यापुढे तपासणीला येणाºया प्रत्येक रुग्णास ताप असल्यास त्याची नोंद करणार आहोत. थोडाही संशय जाणवताच विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल.
- डॉ. आर. बी. पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी

एक नजर आकडेवारीवर
बीड - २७१९२, अंबाजोगाई - १११५२, आष्टी - २१८७५, धारुर - १०८६५, गेवराई - ११०७३, केज - १५५३३, माजलगाव - १००५४, परळी - १०५०५, पाटोदा - ९०६४, शिरुर कासार - १४४७८, वडवणी - ५१६९

Web Title: CoronaVirus: 1 lakh 46 thousand citizens enter the Beed in 36 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.