कोरोना योद्धे चार महिन्यांपासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:38+5:302021-06-26T04:23:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना चार ...

Corona Warriors without pay for four months | कोरोना योद्धे चार महिन्यांपासून वेतनाविना

कोरोना योद्धे चार महिन्यांपासून वेतनाविना

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. रखडलेले वेतन तत्काळ द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी या डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले. मागणी लवकर मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांना निवेदन दिले आहे. फेब्रुवारीपासून वेतन न मिळाल्याने सहाय्यक प्राध्यापक आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन आमची मागणी मान्य करावी. कोरोना काळात अहोरात्र सेवा करून रुग्णांना आधार देण्याचे काम केले. असे असताना प्राध्यापकांचे वेतन रखडले. आजतागायत हे वेतन न मिळाल्याने सहाय्यक प्राध्यापकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने आम्ही गुरुवारपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आमचे हे सामूहिक आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

या आंदोलनात डॉ. अमित लोमटे, डॉ. योगेश गालफाडे, डॉ. शंकर कोठुळे, डॉ. शीतल खडसे, डॉ. मंगल चौरे, डॉ. अंकुश आसोले, डॉ. गणेश ताटे, डॉ. संतोष गोडभरले, डॉ. नागेश अब्दागिरे व अस्थायी प्राध्यापक सहभागी झाले होते.

....

काळ्या फिती लावून निषेध

रुग्णसेवा विस्कळीत होऊ न देण्यासाठी या डॉक्टरांनी कामबंद आंदोलन न करता केवळ काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. मात्र, यानंतरही अन्याय सुरू राहिल्यास नाईलाजाने आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल, असा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे.

....

===Photopath===

250621\img-20210624-wa0108_14.jpg

===Caption===

'स्वाराती'मधील अस्थायी प्राध्यापकांचे काळ्या फिती लावून आंदोलन केले.

Web Title: Corona Warriors without pay for four months