corona virus : कर्मचारी तपासणीत व्यस्त; नजर चुकवून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 19:05 IST2021-04-02T19:03:36+5:302021-04-02T19:05:05+5:30

corona virus : या सर्व प्रकारामुळे रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे.

corona virus : Staff engaged in inspections; Corona positive patient on the way from the hospital | corona virus : कर्मचारी तपासणीत व्यस्त; नजर चुकवून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रस्त्यावर

corona virus : कर्मचारी तपासणीत व्यस्त; नजर चुकवून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रस्त्यावर

धारूर  :  कोविड तपासणी केंद्रावर कोरोनाची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही एक युवक चक्क रस्त्यावर फिरताना आढळून आल्याने आज सकाळी येथे एकच खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात आल्याने ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णास शोधण्यासाठी धावपळ केली. मात्र, काही वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांनीच त्याला रुग्णालयात आणून सोडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा प्रकार रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही परिस्थिती ओढवल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. 

धारूर येथील एका खाजगी डॉक्टरने तांदूळवाडी येथील 39 वर्षीय युवकास लक्षणे असल्याने कोरोना चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते. शुक्रवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान त्याची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूला थांबण्यास सांगितले. लोखंडी सावरगाव येथे त्यांला पुढील उपचारासाठी नेण्यात येणार होते. यानंतर सर्व कर्मचारी संशयितांच्या कोरोन चाचणी करण्यात व्यस्त झाले. येथे अपुरे कर्मचारी असल्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाकडे कोणाचे लक्ष नव्हते. याचाच फायदा घेत तो तरुण थेट रुग्णालयाच्या बाहेर आला. काही वेळाने कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली आणि त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. नातेवाईकांनी लागलीच त्याचा शोधून काढत रुग्णालयात आणून सोडले. यानंतर त्याला लोंखडी सावरगाव येथील कोव्हिड केअर सेंटरला रवाना करण्यात आले. मात्र, या सर्व प्रकारामुळे रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे.

Web Title: corona virus : Staff engaged in inspections; Corona positive patient on the way from the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.