Corona Virus : रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजताच उपचार न घेता ५ कोरोनाबाधित पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 15:05 IST2021-06-10T15:05:23+5:302021-06-10T15:05:43+5:30
Corona Virus: वैद्यकीय अधिकारी यांनी दिली पोलिस ठाण्यात लेखी पत्र

Corona Virus : रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजताच उपचार न घेता ५ कोरोनाबाधित पळाले
आष्टी : ग्रामीण रुग्णालयात कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार न घेता ५ कोरोनाबाधितांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आष्टी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
त्रास जाणवत असल्याने पाच जण ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना टेस्ट करण्यासाठी आज सकाळी आले होते. येथे त्यांची अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. ती पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना दाखल करण्याच्या प्रक्रियेत आरोग्य कर्मचारी होते. मात्र, कोरोनाबाधित ५ जणांनी तेथून पळ काढला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली आहे.