शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

Corona Virus : तांडा चालला;भुकेने व्याकुळ परप्रांतीय मजूर पायी निघाले घराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 7:01 PM

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर असलेले मजूर भुकेने व्याकुळ

ठळक मुद्देलॉक डाऊन होताच गुत्तेदार गेला सोडूनजागेवर राहण्यापेक्षा घराकडे परतत आहेत मजूर

- मधुकर सिरसट/दीपक नाईकवाडेकेज : तालुक्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या  कामावर  उत्तर भारतातील बिहार व उत्तरप्रदेश येथून आणलेल्या मजूरांना सध्या चोहिकडे संचारबंदी आणि जमावबंदी आसल्यामुळे  वा-यावर सोडून  गुत्तेदाराने पलायन केले. त्यामूळे आठदिवसापासून उपाशी पोटी राहणा-या या मजूराच्या तांड्याने  अशा परिस्थितीत अन्नपाण्या वाचून कामावर तडफडून मरण्यापेक्षा  हजारो किमीचा प्रवास  पायी पायी करून आपल्या कुटूंबीयाना भेटण्यासाठी जाण्याचा निर्धार करुन हे मजूर शनिवारी साळेगाव येथून पायपिट करीत केजला आले.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. सर्वत्र जिल्हाबंदी आणि संचारबंदी आहे. मात्र अशा वाईट परिस्थितीत उत्तर भारतातील बिहार आणि उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात राष्ट्रीय महांमार्गाच्या कामावर आलेले मजूर पायीच गावाकडे निघाले आहेत. त्यांच्याकडे ना अन्न पाणी; ना काही सामान आहे. या मजुरांना कामाला घेऊन आलेले परप्रांतीय गुत्तेदारही फरार झाला आहे. त्यामुळे आता कामाच्या ठिकाणी त्यांच्या खानावळी बंद झाल्या आहेत. म्हणून आता अन्नपाण्यावाचून जनावरा सारखे तडफडून उपाशी जिवन जगण्या ऐवजी या मजुरांचा काफीला आता दैवावर भरोसा ठेवून; दिसेल त्या वाटेने; पुढे कोणते संकट येणार आहे. त्याची पुसटशीही कल्पना नसताना आणि आता आपण घरी पोहचू की नाही .याची कोणतीही तमा न बाळगता;   रखरखत्या उन्हातान्हाची पर्वा न करता आपल्या भागाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करण्यात आल्या असून या परप्रांतीय मजूरांचा पुढील प्रवास कसा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या परप्रांतीय मजुरांना वा-यावर सोडून देणा-या गुत्तेदारा विरूद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेकापचे भाई मोहन गुंड,सामाजिक कार्यकर्ते प्रा हनुमंत भोसले , सेवाभावी संस्थेच्या सविता सोनवणे, जनाताई खाडे यांनी केली आहे.

खाकितील माणुसकी जागी झाली

साळेगाव येथून पायी निघालेल्या या परप्रांतीय मजुरांना पोलिसांनी हटकले आसता धक्कादायक प्रकार समोर आला. तेंव्हा खाकितील माणुसकिला पाझर फुटला आणि केज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईनामदार,  गौतम बचुटे व बलभीम बचुटे यांनी शिवाजी चौकात या परप्रांतीय मजूरांना बिस्कीट व पाण्याची व्यवस्था केली.तहसिलदारही धावले मदतीला

रविवारी दुपारी  16 परप्रांतीय मजुरांच्या अल्पोपाहारासाठी तहसीलदार डी सी मेंढके, ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे, चोपणे यांनी मदतीचा हात दिला.तसेच  त्यांनी या मजुरांना परप्रांतात जाण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड