Corona Virus In Beed : धारूरमध्ये सोशल डिस्टनसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीने गर्दी आटोक्यात;प्रशासनाच्या नियोजनास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 15:31 IST2020-03-27T15:21:19+5:302020-03-27T15:31:27+5:30
बाजारात गर्दी कमी करण्याचे प्रशासनाने केले नियोजन

Corona Virus In Beed : धारूरमध्ये सोशल डिस्टनसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीने गर्दी आटोक्यात;प्रशासनाच्या नियोजनास यश
धारूर : संचारबंदी शिथीलतेच्या काळात जिवनवाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी नगरपालीका प्रशासनाने पोलीसांच्या मदतीने प्रभावी उपाययोजना केली. शहरात सात ठिकाणी भाजीपाला बाजार भरवत व्यवस्थापन व्यवस्थीत केल्यामुळे बाजार दिवस असताना हि होणारी गर्दी रोकण्यात यश आले आहे.
धारूर शहरात संचारबंदी शिथील काळात होणारी गर्दी रोकण्या साठी नगरपालीका मुख्याधीकारी सुहास हजारे यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने प्रभावी उपाययोजन केली. विभाग निहाय शहरात सात ठिकाणी भाजीपाला बाजार भरवण्यात आला. यानंंतर बसस्थानक ,हनूमान चौक, गायकवाड गल्ली, काशीनाथ चौक , आठवडी बाजारतळे, कजबा चावडी, अहिल्याबाई नगर या ठिकाणणी सोशल डिस्टसचे नियम पाळत आखणी करून भाजीपाला विक्रेत्याना बसवण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी नगरपालीका कर्मचारी व पोलीस कर्मचारी व्यवस्थे साठी ठेवले, मुख्यरस्त्यावर सुरक्षा बॕरीकेट लावले होते .मुख्याधीकारी सुहास हजारे पोलीस निरीक्षक सुरेखा धस या सर्व ठिकाणी स्वतः लक्ष ठेवून होते या मुळे आठवडी बाजाराचा दिवस असताना हि कुठे हि गर्दी दिसत नव्हती. तसेेेच किराणा व औषध दुुकानांंसमोर चौकोण आखणी करण्यात आली. यामुळे शहरात गर्दी दिसूूून आली नाही. व्यवस्थापनमुळे हे यश मिळाल्याने प्रशासनाचे कौतूक होत आहेे.