पहिल्याच दिवशी ६८ ज्येष्ठ नागरिकांना दिली कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST2021-04-01T04:34:22+5:302021-04-01T04:34:22+5:30

दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना विषाणू प्रतिबंधक लस बुधवारपासून देण्यात येत आहे. यावेळी रणखांब बोलत होते. ग्रामीण भागात ...

Corona vaccine was given to 68 senior citizens on the first day | पहिल्याच दिवशी ६८ ज्येष्ठ नागरिकांना दिली कोरोना प्रतिबंधक लस

पहिल्याच दिवशी ६८ ज्येष्ठ नागरिकांना दिली कोरोना प्रतिबंधक लस

दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना विषाणू प्रतिबंधक लस बुधवारपासून देण्यात येत आहे. यावेळी रणखांब बोलत होते. ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक शंका-कुशंका असल्याने नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. ही लस अत्यंत सुरक्षित असून, कोरोना आजारापासून आपला बचाव करते. तेव्हा कुठलीही शंका न बाळगता सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डाॅ. रणखांब यांनी केले आहे.

आठवड्यातील तीन दिवस दिंद्रुड येथे लस देण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ करण्यासाठी दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार, ग्रामपंचायत सदस्य राजेभाऊ कटारे, बाबासाहेब देशमाने, सहप्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. याज्ञिक रणखांब, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. स्वाती काशीद, मुख्य आरोग्यसेविका वर्षा पवार, आरोग्य सहायक बी. जे. ठोंबरे, आरोग्यसेविका कीर्ती सोळंकेसह आशा वर्कर मंदा कसबे देशमाने, शीतल सिरसे, सविता काटे, मनोरमा लाड, आदी उपस्थित होते.

===Photopath===

310321\img-20210331-wa0118_14.jpg

Web Title: Corona vaccine was given to 68 senior citizens on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.