कोरोना प्रतिबंधक लस संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:50+5:302021-04-11T04:32:50+5:30
शिरूर कासार : सुरुवातीस काहीशी भीती वाटत असल्याने लस घेण्यास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आरोग्य विभागाकडून लस ...

कोरोना प्रतिबंधक लस संपली
शिरूर कासार : सुरुवातीस काहीशी भीती वाटत असल्याने लस घेण्यास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आरोग्य विभागाकडून लस घेण्याबाबत वारंवार आवाहन केले जात होते. मात्र, लस घेतल्यानंतर काही त्रास होत नाही अशी खात्री पटल्यानंतर लस घेण्याकडे कल वाढला असतानाच आता तालुक्यात लस संपली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी दिली. आता लस पुरवठा प्राप्त होईपर्यंत लस देण्याचे काम थांबले आहे. लस प्राप्त होताच पुन्हा लसीकरण सुरू होईल असेही सांगितले.
शिरूरला कडकडीत लाॅकडाऊन, पोलिसांची गस्त
शिरूर कासार : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशाननाकडून शनिवारी कडकडीत लाॅकडाऊन आदेश जारी केल्याने शिरूरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रस्त्यावर तुरळक रहदारीशिवाय सर्वत्र सन्नाटा दिसत होता. नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस सतर्क होते. उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र पवारसह पोलीस कर्मचारी सतत गस्तीवर फिरत होते.
शेतात शेळी आल्याने एकाचे डोके फोडले, गुन्हा दाखल
शिरूर कासार : तालुक्यातील औरंगपूर येथे शेळी शेतात आल्याच्या कारणावरून दगड मारून डोके फोडल्याची घटना ९ एप्रिल दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल ज्ञानदेव जाधव यांच्या चुलतीची शेळी जालिंदर सूर्यभान दुधाळ (रा. हिवरसिंगा) यांच्या शेतात गेली या कारणाने संगनमत करून जालिंदरसह अन्य दोघांनी अमोल जाधव यास शिवीगाळ करीत लाथा बुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय जालिंदर दुधाळ यांनी दगड मारून अमोल जाधव यांच्या डोक्याला दुखापत केली अशी फिर्याद दिल्यावरून तिघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलीस जमादार हरी जाधव हे करीत आहेत.