चुलीवर स्वयंपाकाला पंसती, गॅसदरवाढीचा गृहिणींना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:03 IST2021-03-04T05:03:23+5:302021-03-04T05:03:23+5:30

वडवणी : पेट्रोल व डिझेलबरोबरच आता गॅस सिलिंडरच्या दरातही चालू महिन्यात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे तीन ...

Cooking on the stove, housewives hit by gas price hike | चुलीवर स्वयंपाकाला पंसती, गॅसदरवाढीचा गृहिणींना फटका

चुलीवर स्वयंपाकाला पंसती, गॅसदरवाढीचा गृहिणींना फटका

वडवणी : पेट्रोल व डिझेलबरोबरच आता गॅस सिलिंडरच्या दरातही चालू महिन्यात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे तीन महिन्याखाली ६२० रुपयांना असणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात २२५ रूपयांनी वाढ होऊन ते ८४५ रूपयांना झाले आहे. त्यामुळे उज्वला योजनेचे शहरासह ग्रामीण भागातील लाभार्थी संताप व्यक्त करत आहेत. गॅसच्या दरवाढीमुळे ग्रामीण भागात बहुतांश गृहिणी चुलीवर स्वयंपाकासाठी वळल्याचे चित्र दिसत आहे. केंद्र सरकारने गॅसची सबसिडी कमी केली आहे. सद्य स्थितीत फक्त ९ रूपये ९३ पैसे सबसिडी मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घरात गॅस असतानाही चुलीवर स्वयंपाक करणे पसंद केले आहे.

याबाबत शहरातील भारत गॅसचे विक्रेते दशरथ गुरसाळी म्हणाले, उज्वला योजनेंतर्गत जवळपास ७ हजार ५०० गॅसचे वाटप करण्यात आलेले आहेत. तीन महिन्यात झालेली गॅसची दरवाढ यामुळे लाभार्थी गॅस सिलिंडर भरून घेताना नाराजीचा सूर व्यक्त करत आहेत.

Web Title: Cooking on the stove, housewives hit by gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.