विदेशी दारूचा कंटनेर ताब्यात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST2021-02-26T04:46:24+5:302021-02-26T04:46:24+5:30

बीड : तालुक्यातील कुमशी येथे कंटेनरमध्ये भरून आलेली तब्बल ३६ लाख ७२ हजार रुपयांची गोवा राज्यातील बनावटीची ...

Container of foreign liquor in possession - A | विदेशी दारूचा कंटनेर ताब्यात - A

विदेशी दारूचा कंटनेर ताब्यात - A

बीड : तालुक्यातील कुमशी येथे कंटेनरमध्ये भरून आलेली तब्बल ३६ लाख ७२ हजार रुपयांची गोवा राज्यातील बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास केली. यावेळी कंटनेरसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप व औरंगाबाद विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक डी.एल. दिंडकर, दुय्यम निरीक्षक एस.बी. शेळके, ए.जे. राठोड, ए.आर. गायकवाड, ए. एस. नैबळ, जवान सचिन सांगुळे, अमीन सय्यद, नितीन मोरे, प्रशांत मस्के, आर.एम.गोणारे, वाहनचालक शेळके यांनी केली.

Web Title: Container of foreign liquor in possession - A