वैद्यनाथ मंदिर परिसरात ज्ञानक्षेत्र वास्तूची होतेय उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:24+5:302021-07-02T04:23:24+5:30

वैद्यनाथ मंदिर परिसरात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारद्वारा ज्ञानक्षेत्र या वास्तूची उभारणी केली जात आहे. या भूमिपूजन आनंद सोहळ्यात आध्यात्मिक ...

Construction of Gyankshetra Vastu in Vaidyanath temple area | वैद्यनाथ मंदिर परिसरात ज्ञानक्षेत्र वास्तूची होतेय उभारणी

वैद्यनाथ मंदिर परिसरात ज्ञानक्षेत्र वास्तूची होतेय उभारणी

वैद्यनाथ मंदिर परिसरात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारद्वारा ज्ञानक्षेत्र या वास्तूची उभारणी केली जात आहे. या भूमिपूजन आनंद सोहळ्यात आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी परळीकरांसोबत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी वैद्यनाथ नगरीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे ज्ञानक्षेत्र निर्मित होत असल्याबाबत विशेष आनंद व्यक्त केला. हे कार्य लीलया पूर्ण होईल आणि सर्व समाजबांधवांना या ज्ञानक्षेत्राचा लाभ होईल, असा आशावाद व्यक्त करीत आगामी काळात नक्कीच परळी नगरीत येण्याची इच्छा व्यक्त केली. व्हीव्हीकेआयचे चेअरमन प्रसन्ना प्रभू, महाराष्ट्र अपेक्सचे मेंबर शेखर मुंदडा, डॉ. अनिल गर्ग, प्रभंजन महातोले यांनीसुद्धा ऑनलाईन संवाद साधला.

वैद्यनाथ मंदिर परिसरात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्षा सरोजिनी हालगे व स्वामी वेदानंद यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्यास ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, विनोद सामत, नगरसेवक चेतन सौदळे, महादेव ईटके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शरद डोलारकर, राजेंद्र सामत, बापूदादा देसाई, शिरीश चौधरी, संदीप तिळकरी, सुदाम कापसे, अनुप भन्साळी, जगदीश मिटकरी, संजय सेवलकर, वशिष्ठ कुकडे, पप्पू बालदी व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन माधुरी ईटके यांनी केले. प्रशिक्षक मुकेश भुतडा यांनी आभार मानले.

मराठवाड्यातील पहिलीच इमारत राहतेय उभी...

मराठवाड्यात अशी इमारत प्रथमच उभा टाकत आहे. तीन मजले इमारत व भव्य असे ज्ञान मंदिर उभारले जाणार आहे. इमारतीत ध्यान साधना व योग प्राणायाम सुविधा असणार आहे. इमारतीत परिसरातील नागरिकांसाठी ध्यान प्राणायाम, सुदर्शन क्रिया, शिबिराचे आयोजन करून मार्गदर्शन केले जाणार आहेत. युवक व युवतींसाठी युवक नेतृत्व शिबिर घेण्यात येतील.

Web Title: Construction of Gyankshetra Vastu in Vaidyanath temple area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.