बीड लोकसभा लढण्यास कॉँग्रेस तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:53 IST2019-01-14T00:52:13+5:302019-01-14T00:53:32+5:30
आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कॉँग्रेस पक्ष तयार असल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

बीड लोकसभा लढण्यास कॉँग्रेस तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कॉँग्रेस पक्ष तयार असल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
१३ जानेवारी रोजी येथे झालेल्या कॉँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीस पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे हे उपस्थित होते. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून बीड लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक उमेदवारांशी यावेळी चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवारांची नावे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीस कळविण्यात येणार असल्याचे बैठकी दरम्यान सांगण्यात आले.
जिल्हा सरचिटणीस अॅड. राहुल साळवे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकीमध्ये समविचारी व धर्मनिरपेक्ष, राजकीय पक्षांना एकत्र आणून मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर होत आहे. महाराष्ट्रातही समविचारी मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची बोलणी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. मित्र पक्षांसोबत जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून लवकरच घेतला जाणार आहे. बीड जिल्ह्यात अनेक मातब्बर काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार आहेत. अशा इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून ती जिल्हा निवड मंडळामार्फत इच्छूक उमेदवारांशी चर्चा करून प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे.
यावेळी मोदी यांनी जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक बांधणी, पक्षाचे जनसंपर्क अभियान, बूथ कमिट्यांची बांधणी आदी विषयांवर माहिती देत चर्चा केली.
बैठकीस माजी आ. नारायण मुंडे, माजी आ. सिराज देशमुख, बाबूराव मुंडे, अंजली घाडगे, सेवादल नेते शहादेव हिंदोळे, तालुकाध्यक्ष महादेव धांडे, जिल्हा सचिव अॅड. विष्णूपंत सोळुंके, महादेव आदमाने, सुनील नागरगोजे, अॅड. निंबाळकर, सेवादल जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी, गोविंद साठे, आसिफोद्दीन खतीब, गणेश राऊत, अविनाश डरफे, फरीद देशमुख, राणा चव्हाण, दादासाहेब मुंडे, चरणसिंग ठाकूर, विजय मुंडे, सूर्यकांत मुंडे, डॉ. शेरखान, रवि ढोबळे, नागेश मिठे, महादेव मुंडे, विठ्ठल जाधव, हरिभाऊ सोळुंके, राहुल वावळे, सफदर देशमुख, शामसुंदर जाधव, जयप्रकाश प्रकाश आघाव आदी उपस्थित होते.