अंबाजोगाईतील मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:49 IST2017-12-25T00:48:54+5:302017-12-25T00:49:46+5:30

अंबाजोगाई येथे रविवारी सुरु झालेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमलन समारोप सोमवारी सायंकाळी ६ वाजता संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

The concluding day of Marathwada Sahitya Sammelan in Ambajogai concludes today | अंबाजोगाईतील मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप

अंबाजोगाईतील मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथे रविवारी सुरु झालेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमलन समारोप सोमवारी सायंकाळी ६ वाजता संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमास अतिथी म्हणून खा. डॉ.प्रीतम मुंडे, अक्षयकुमार काळेसह मान्यवर उपस्थित राहतील.

बाबासाहेब परांजपे व्यासपीठावर होणाºया या कार्यक्रमात ९१ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, बडोदाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा विशेष सत्कार होणार आहे. यावेळी आ.भीमराव धोंडे, आ.संगीता ठोंबरे, आ.विनायक मेटे, बदामराव पंडित, राजकिशोर मोदी, रामचंद्र तिरुके उपाध्यक्ष, जि.प.लातूर, संजय दौंड, विलास सोनवणे, हनुमंत मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: The concluding day of Marathwada Sahitya Sammelan in Ambajogai concludes today