साबला येथे पोकरा प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजन आराखड्यास प्रारंभ - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST2021-02-25T04:41:22+5:302021-02-25T04:41:22+5:30
लोक सहभागासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेसमोर ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाच्या संसाधनांचा व ...

साबला येथे पोकरा प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजन आराखड्यास प्रारंभ - A
लोक सहभागासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेसमोर ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाच्या संसाधनांचा व पाणलोट क्षेत्र क्षमता उपचार नकाशा रांगोळीच्या सहाय्याने काढून प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून गावामध्ये अस्तित्वात असलेल्या संरचना सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, सलग समतल चर, शेततळे, गॅबियन बांध, नाला खोलीकरण,शेडनेट आणि पाणलोटाच्या प्रस्तावित करायच्या कामांचे विश्लेषण केले. मंडळ कृषी अधिकारी व्ही. व्ही .कदम, कृषी पर्यवेक्षक जी. पी. गायकवाड, कृषी सहाय्यक अनिल लोंढे यांनी ग्रामस्थांना सूक्ष्म नियोजनाच्या तांत्रिक बाबी व कृती आराखड्याची प्रपत्रे समजावून सांगून जल व मृदा संधारणाचे महत्त्व सांगितले, तसेच जास्तीत जास्त ग्रामस्थांनी पोकरा प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजनाच्या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले.
मनुष्यबळ विकास अधिकारी जयशिव जगधने यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधून पोकरा प्रकल्पाच्या योजनांची माहिती दिली. प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा अंतर्गत शेतकरी बचत गट, महिला बचत गट स्थापन करण्याचे आव्हान केले आणि पोकरा प्रकल्पांतर्गत असलेल्या गटासाठी असलेल्या योजनांची माहिती देऊन नाबार्ड बँक, उमेद अभियान, स्मार्ट प्रकल्प यांच्या कृती संगमातून डाळ मिल उद्योग, कापूस प्रक्रिया उद्योग उभारणी संदर्भात मार्गदर्शन केले. शेतीशाळा प्रशिक्षक अमोल सोनवणे यांनी खरीप हंगामातील शेतीशाळा संदर्भात चर्चा घडवून आणली. पाणलोट कामे प्रस्तावित करण्यासाठी शिवार फेरी काढण्यात आली.
सदर उपक्रमाला सरपंच महादेव कटारे, हनुमंत काकडे, नारायण काकडे, आकाश काकडे, अशोक नाईकनवरे, मधुकर काकडे, राहुल सरवदे, विशाल मुळे, रामकिसन मुळे, काशिनाथ नाईकनवरे, अशोक नाईकनवरे, दत्ता काकडे, बापूराव काकडे, अर्चना भोसले, विष्णू मुळे, कपिल नाईकनवरे, हनुमंत मुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.