दिलासादायक; डेल्टा रुग्ण आढळलेल्या परिसरात संसर्ग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:26+5:302021-08-12T04:37:26+5:30
बीड : जिल्ह्यात नोंदविलेल्या पहिल्या डेल्टा प्लसच्या रुग्णामुळे संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत होती. परंतु आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ...

दिलासादायक; डेल्टा रुग्ण आढळलेल्या परिसरात संसर्ग नाही
बीड : जिल्ह्यात नोंदविलेल्या पहिल्या डेल्टा प्लसच्या रुग्णामुळे संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत होती. परंतु आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात या भागात मागील दोन महिन्यात केवळ पाचजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच ३४५ घरांचे सर्वेक्षण केले असता एकालाही लक्षणे आढळली नसल्याने दिलासा मिळाला आहे.
बीड शहरातील अजिजपुरा भागातील एकाला दोन महिन्यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. महिनाभर उपचार करून घरी गेल्यावर त्याचा मृत्यू झाला. इकडे दोन महिन्यानंतर त्याला डेल्टा प्लस झाल्याचे उघड झाले. त्यामुळे अजिजपुरा व माळी गल्ली या भागात जाऊन तात्काळ सर्वेक्षणास सुरुवात केली. ३४५ घरांची माहिती घेतली असता, एकालाही लक्षणे आढळली नाहीत. तसेच मागील दोन महिन्यात केवळ पाचच लोक पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये कुटुंबातील एकाचाही समावेश नाही. यावरून या भागात कोरोनाचा संसर्ग झाला नाही, हे स्पष्ट झाले. यामुळे सामान्यांसह आरोग्य विभागाने मोकळा श्वास घेतला आहे.
--
अजिजपुरा व माळी गल्लीतील ३४५ घरांचे सर्वेक्षण केले. यात एकालाही लक्षणे आढळली नाहीत. तसेच दोन महिन्यात केवळ ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यात त्याच्या कुटुंबातील एकही व्यक्ती नाही. सर्वेक्षणातील आकडेवारीवरून या भागात संसर्ग झाला नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे असले तरी कोरोनाचे नियम पाळून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. नरेश कासट, तालुका आरोग्य अधिकारी, बीड