गवताद्वारे सीएनजी गॅसचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान, प्रकल्पातून ८०० युवकांना रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:48 PM2021-06-16T17:48:30+5:302021-06-16T17:54:50+5:30

Grass to CNG gas project in Beed देशातील मीरा क्लीन फ्युएल्स प्रा.ली.कंपनी व दीपअर्चना ॲग्री प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील खरात आडगाव शिवारात मोगरा रोडवरील १३ एकर जागेवर हा ५० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प उभा राहत आहे.

CNG gas production project through grass will be a boon for farmers, 800 youth will get employment | गवताद्वारे सीएनजी गॅसचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान, प्रकल्पातून ८०० युवकांना रोजगाराच्या संधी

गवताद्वारे सीएनजी गॅसचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान, प्रकल्पातून ८०० युवकांना रोजगाराच्या संधी

googlenewsNext
ठळक मुद्दे गवतापासून सीएनजी गॅस तयार करणे व सेंद्रिय खत तयार करणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्टशेतकऱ्यांना गुंतवणूक काहीच नसून खत-औषधाच्या ससेमिऱ्यातुन सुटका होणार

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव : केंद्र शासनाच्या सतत योजनेअंतर्गत माजलगाव तालुक्यात गवतापासून सीएनजी गॅस (जैवइंधन) प्रकल्पाची उभारणी होणार आहे. प्रकल्प उभारणीत तालुक्यातील 800 युवकांना रोजगाराची संधी लवकरच उपलब्ध होणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. 

देशातील मीरा क्लीन फ्युएल्स प्रा.ली.कंपनी व दीपअर्चना ॲग्री प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील खरात आडगाव शिवारात मोगरा रोडवरील १३ एकर जागेवर हा ५० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प उभा राहत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गजराज गवतापासून सीएनजी गॅस तयार करणे व सेंद्रिय खत तयार करणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. सदरील गवतापासून अवघ्या तीन महिन्यात गॅस निर्मिती होते. त्यामुळे इतर पिकांपेक्षा शेतकऱ्यांना गजराज गवत, कांडी गवत, हत्ती गवतापासून वर्षभरात चार उत्पन्न घेता येतात. यात शेतकऱ्यांना टनामागे एक हजार रुपयांचा मोबदला मिळणार आहे. त्याचबरोबर सदरील उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी गुंतवणूक काहीच नसून खत-औषधाच्या ससेमिऱ्यातुन पण त्यांची सुटका होणार असल्याने एक प्रकारे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी तालुक्यात वरदान ठरणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पाचे उभारणीतून जवळपास आठशे ते हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.जुलै महिन्यात प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात होणार असून येणाऱ्या जानेवारीपर्यंत प्रकल्प कार्यान्वित होण्याची माहिती कार्यकारी संचालक सौरभ जाधव यांनी दिली. याप्रसंगी कंपनीचे चेअरमन दीपक जाधव व संचालक अरुण राऊत यांची उपस्थिती होती.

या प्रकल्पासाठी १० हजार शेअर्सची विक्री कंपनी करत आहे. शेतकऱ्यांना प्रति शेअर पाचशे रुपये प्रमाणे आतापर्यंत ४ हजार ५०० शेअर्स विक्री झाले आहेत. तालुक्यातील तालखेड, नित्रुड,गंगामसला,दिंद्रुड यासह मोठ्या ग्रामपंचायती असणाऱ्या गावात कंपनीचे कार्यालय स्थापन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेअर्स खरेदीसाठी या ठिकाणी संपर्क करण्याचे आवाहन कंपनीचे चेअरमन दीपक जाधव यांनी केले आहे.

Web Title: CNG gas production project through grass will be a boon for farmers, 800 youth will get employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.